तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या एकलव्य विद्या संकुलाच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील विजेत्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक यशवंत निंबाळकर व मान्यवर.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुका क्रीडा संकुल येथे १ ऑक्टोबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत एकलव्य विद्या संकुलातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले. १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही अव्वल स्थान मिळवत एकलव्य विद्या संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
दोन्ही संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे १४ व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांची आगामी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दुहेरी यशामुळे एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल दोन्ही संघांतील खेळाडू तसेच प्रशिक्षक यशवंत निंबाळकर यांचे इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिवचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते, संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित, डॉ. प्रणिता गडेकर, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर, अनिल घुगे, डॉ. प्रशांत कोथळकर, गोविंद सोमाणी, संतोष बनसोडे, प्रणिता शेटकार, फुलाजी ताटी कुंडलवार, मयूर अंतरेड्डी, संगीता पाचंगे, दयानंद भडंगे, दत्ता भोजने व कोंडीबा देवकर यांनी अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेतही दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी करून एकलव्य विद्या संकुलाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या.
0 Comments