Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील सुनंदा हंगरगेकर यांचे निधन


​काटी | प्रतिनिधी 
​तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा प्राध्यापक अभिमान हंगरगेकर यांच्या पत्नी सुनंदा अभिमान हंगरगेकर (वय ६५) यांचे शनिवारी (दि. १०) दुपारी अडीचच्या सुमारास धाराशिव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
​त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानंतर त्यांना तातडीने धाराशिव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

​त्या प्राध्यापक अभिमान हंगरगेकर यांच्या पत्नी आणि मुंबई महानगरपालिकेतील अभियंता यशपाल हंगरगेकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल काटी आणि धाराशिव परिसरात शोककळा पसरली आहे.
​त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी (दि. ११) सकाळी ८ वाजता धाराशिव येथील कपिलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

​त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments