Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मोतीबिंदूमुक्त तामलवाडीकडे पाऊल; श्री. दत्ता (भैय्या) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न होणार

​'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी| उमाजी गायकवाड 
“निरोगी दृष्टी ठेवुया वडिलधाऱ्यांच्या नजरेत राहुया” हा उदात्त विचार समोर ठेवत आणि सामाजिक दायित्वाचे भान राखत, तुळजापूर पंचायत समितीचे मा. उपसभापती श्री. दत्ता (भैय्या) भास्कर शिंदे यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त एका महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

तामलवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयात येत्या शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी 'मोफत नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे' आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​मोतीबिंदूमुक्त तामलवाडीचा संकल्प
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या डोळ्यांची कसून तपासणी केली जाईल.तपासणीदरम्यान ज्या रुग्णांमध्ये मोतीबिंदू असल्याचे निदान होईल, त्यांच्यासाठी सोलापूर येथील प्रतिष्ठित 'शंकरशेठ साबोळे नेत्र रुग्णालय (बाळे, बार्शी रोड, सोलापूर)' येथे अत्यंत सुरक्षितपणे मोफत शस्त्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

​रुग्णांसाठी सर्वसमावेशक मोफत सुविधा
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांची सोलापूरपर्यंत नेण्या-आणण्याची (वाहतूक व्यवस्था), तसेच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण सोय आयोजकांकडून पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.

​वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
​स्थान: सरस्वती मंगल कार्यालय, तामलवाडी

​सहकार्य व आव्हान
या शिबिराला 'शंकरशेठ साबोळे नेत्र रुग्णालय' यांचे विशेष सहकार्य लाभले असून, ‘मोतीबिंदूमुक्त तामलवाडी’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी श्री. दत्ता (भैय्या) शिंदे व मित्र परिवाराने कंबर कसली आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

​अधिक माहिती व संपर्कासाठी: श्री. दत्ता (भैय्या) भास्कर शिंदे 
(मो.नं. ९२८४१५७५००)

Post a Comment

0 Comments