मुरुड (ता. जि. लातूर) :
Only न्युज धाराशिव | उमाजी गायकवाड
सकल मराठा समाजातील विवाह इच्छुक तरुण-तरुणींना एकाच छताखाली योग्य जोडीदार निवडता यावा, या उदात्त सामाजिक हेतूने 'सकल मराठा वधू-वर सूचक समिती, मराठवाडा' यांच्या वतीने रविवार, दिनांक २० डिसेंबर २०२६ रोजी मुरुड (ता. जि. लातूर) येथे भव्य मोफत वधू-वर सूचक परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर-बार्शी महामार्गावरील मुरुड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत हा महामेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रथम वधू-वरांसोबतच घटस्फोटित आणि दिव्यांग (अपंग) वधू-वरांचीही विशेष नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व घटकांतील विवाह इच्छुकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या विवाह जुळणीचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी समितीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे.
वेळेचा आणि खर्चाचा अपव्यय टळणार
सध्याच्या धावपळीच्या युगात अनुरूप जोडीदार शोधणे पालकांसाठी मोठे जिकिरीचे बनले आहे. अनोळखी मध्यस्थांकडून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आणि वधू-वर व त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष समोरासमोर संवाद साधता यावा, यासाठी हा मोफत महामेळावा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे विवाह जुळणी प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून सर्वसामान्य कुटुंबांचा मोठा आर्थिक आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.
प्रमुख मार्गदर्शकांचे पाठबळ
या महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मा. श्री. वैभव सापसोड (मुरुड), मा. श्री. विजय बापू नाडे (मुरुड), मा. श्री. नितीन काळे (धाराशिव), मा. श्री. उमेश राजेनिंबाळकर (धाराशिव), मा. श्री. चंद्रसेन देशमुख (धाराशिव), मा. श्री. तानाजी जाधव (येडशी) आणि मा. श्री. श्रीराम खामकर (तेरखेडा) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत.
नाव नोंदणीसाठी तालुका व जिल्हास्तरावर संपर्क यंत्रणा
मेळाव्याला लातूर, धाराशिवसह संपूर्ण मराठवाडा आणि पुणे, बीड, संभाजीनगर येथून मोठ्या संख्येने वधू-वर व पालक उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांच्या सोयीसाठी विविध शहरांत व गावांत खालीलप्रमाणे समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुरुड : मा. श्री. अंकुश नाडे (९८६०१४२०१०), मा. श्री. रमेश पवार (९८७०५७९१६६), मा. श्री. शिवाजी काळे (मामा) (८४५९४१६१००), मा. श्री. चंद्रकांत पटाडे (९५०३५५९८४५).
धाराशिव जिल्हा : मा. श्री. अशोक गायकवाड (९३०७०५५३६२),
मा. श्री. विजय पवार (९४०४३१३९१८),
मा. श्री. राजू तांबे (८०८७७८३९५३),
मा. श्री. अशोक ठोंबळ (९४२३९९३१०७).
तुळजापूर तालुका : मा. श्री. अमोल निंबाळकर (९६५७६८४६४८),
मा. श्री. उमाजी गायकवाड (९९२३००५२३६),
मा. श्री. हनुमंत भालेकर (९८८१९१३२४४).
पुणे शहर : मा. श्री. विजय वाघ (९९२२४२६५४२),
मा. श्री. विक्रम जोगदंड (९०२८३७१७८८),
मा. श्री. अरुण मगर (९६३७००८१५१),
मा. श्री. ज्योतीराम पवार (९८२२७४३२५३).
इतर प्रमुख ठिकाणे :
मा. श्री. प्रदिप तांबे - झरेगांव (७७९८११४२९८),
मा. श्री. किसन वळेकर - बीड (८१४९३००१००),
मा. श्री. भास्कर जाधव - दारफळ (९६८९२७७४५०), मा. श्री. उमाकांत तपसाळे - उमरगा (९३७००८७६५९), मा. श्री. अर्जुन जाधव - गुंफावाडी (९८२३९९७६९८), मा. श्री. तानाजी बिरंजे - अंबेजवळगा (९४२१३५७७३४),
मा. श्री. चंद्रकांत खुने - भातंब्रा (९९२२८९९६६१), मा. श्री. पंडीत मोरे - संभाजीनगर (९४२१६८३०३०),
मा. श्री. बाळासाहेब गवळी - नारी (८७८८०५७२७२),
मा. श्री. मधुकर महाराज - रुईभर (९११२८७५२३३), मा. श्री. बिभीषण मोरे - आंबेवाडी (९४२२४६४३९०), मा. श्री. नवनाथ काळे - चिखली (८६२३८५१६६५), मा. श्री. दत्ता इंगळे - केज (९९२२८८७०८०),
मा. श्री. गरड महाराज - खानापूर (९६८९६५७९११), मा. श्री. बालाजी भोसले - देगलूर (९१४६०८५७०१), मा. ॲड. रमेश भोसले - हिंगळजवाडी (९४२२४६७२३९),
मा. श्री. गणपतराव गादगे - उदगीर (९४२१३७०११६), मा. श्री. वैजनाथ शिंदे - अंबेजोगाई (९४२००३३२०५).
या महामेळाव्यात इच्छुक वधू-वरांनी आवश्यक बायोडाटा व छायाचित्रांसह वेळेवर उपस्थित राहून या मोफत उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकल मराठा वधू-वर सूचक समिती, मराठवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
💍 सकल मराठा वधू-वर सूचक मोफत महामेळावा! 💍
🗓️ कधी : रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ (सकाळी ७ ते दु. ४)
📍 कुठे : लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, लातूर-बार्शी रोड, मुरुड, ता. जि. लातूर.
✨ विशेष आकर्षण : प्रथम वधू-वरांसह घटस्फोटित व दिव्यांग वधू-वरांचीही मोफत नोंदणी!
0 Comments