अतनुर/प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील ग्रामपंचायतचे युवा सरपंच चंद्रशेखर अशोकराव पाटील यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट तर्फे देण्यात येणारा मानाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सरपंच चंद्रशेखर अशोकराव पाटील यांनी एक युवा सरपंच म्हणून वेगळी छाप निर्माण केली आहे. आपल्या कार्यकालामधे अनेक लोकांना शैक्षणिक, सामाजिक व अर्थिक मदत ते सतत करत असतात. गावच्या विकासासाठी अहोरात्र झटत असतात. विविध कल्याणकारी योजना राबवून गाव व परिसराचा विकास करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व धर्माच्या सण व उत्सवात सहभाग घेतात, भेट देवून त्यांच्या आनंदात सहभागी होतात. तसेच विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र तर्फे समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुस्कार दि. २४ डिसेंबर २०२३, रविवार रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते कै. दगडोजीराव देशमुख सभागह, मार्केट यार्ड, लातूर येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. युवा आदर्श सरपंच चंद्रशेखर पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्ल राज्यमंञी ना. संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे, माजी सैनिक शेख आयुब, ईस्माईल मुंजेवार, अर्जुन आगलावे मामा, विठ्ठलराव चव्हाण, प्रमोद संगेवार, बाबु कापसे, दिलीप कोकणे, विकास सोमुसे, रौफ मुंजेवार, ईश्वर कुलकर्णी, गणेश गायकवाड, राहुल गायकवाड आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments