Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील सागर मोटर्सकडून आयोजित लकी ड्रॉ कुपनद्वारे काढण्यात आलेल्या ग्राहकांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण; विक्रमी विक्री करणारे अधिकृत विक्रेते लाडुळकर यांना हिरो कंपनीच्या वतीने उत्कृष्ट सर्व्हिस पुरस्कार

काटी|उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हिरो  मोटारसायकचे अधिकृत विक्रेते तथा सलग पाच वर्षांपासून उत्तम सेवा देणाऱ्या लाडुळकर बंधूंच्या सागर मोटर्स कडून ग्राहकांसाठी हिरो मोटारसायकलचा दसरा व दिवाळीला खास मेळावा  भरविण्यात  आला होता. या कालावधीत काटीतील लाडुळकर बंधुंनी सागर मोटर्समध्ये विविध मॉडेल्स मध्ये  गाड्या उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्याच बरोबर गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकास लकी ड्रॉ कुपन देण्यात आले  होते. या लकी ड्रॉ कुपनद्वारे अनुक्रमे वाशिंग मशिन, एलईडी.टी.व्ही, गिझर, मिक्सर, व टेबल फॅन तसेच भिंतीवरील घड्याळ  प्रत्येक गाडी  खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दिले जाणार होते. 

सागर मोटर्सकडून  शुक्रवार दि. 15 रोजी  सायंकाळी 6 वाजता दसरा व दिवाळीला हिरो बाईक आठखरेदी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात आलेल्या लकी ड्रॉ कुपनची सोडत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होऊन विजेत्या ग्राहकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सरपंच परिषदेतचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर व माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हिरो गाड्यांचे अधिकृत विक्रेते लाडुळकर बंधुंना शुभेच्छा दिल्या.

या बक्षिस वितरण सोहळ्यात प्रथम पारितोषिक बापुसाहेब विष्णू कदम पांगरदरवाडी हे
वाशिंग मशिन विजेता ठरले. तर द्वितीय एलईडी.टी.व्ही हसन चॉंद अन्सारी (काक्रंबा) यांना मिळाले.

तृतीय पारितोषिक सागर सपकाळ (हात्तीज) यांना टेबल फॅन चतुर्थ  गणेश चंद्रकांत सुतार रुईभर यांना गिझर  तर पाचवे बक्षीस आप्पा नामदेव चौधरी (सारोळा ता . बार्शी)मिक्सर   मिळाले व भिंतीवरील घड्याळ दसरा व दिवाळीमध्ये हिरो बाईक खरेदी करणाऱ्या प्रत्येक  ग्राहकांना देण्यात आले.

लाडुळकर यांचा उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मान 
हिरो बाईकची उत्कृष्ट विक्री व सेवा दिल्याबद्दल  अधिकृत विक्रेते परमेश्वर लाडुळकर व बंधुंचा हिरो कंपनीच्या वतीने हिरो मोटोकार्पचे  सर्व्हिस मॅनेजर पुणे ऑफिसचे सुनिल राऊत यांच्या हस्ते  उत्कृष्ट  सर्व्हिस या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, उपसरपंच  जुबेर शेख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, सयाजीराव  प्रतापराव देशमुख, हिरो मोटोकार्पचे सर्व्हिस मॅनेजर सुनिल राऊत, प्रकाश गाटे, पत्रकार  उमाजी गायकवाड, मंगरुळचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी, रामेश्वर लाडुळकर, परमेश्वर लाडुळकर,ज्ञानेश्वर लाडुळकर, बजाज फायनान्सचे एरिया मॅनेजर तुकाराम यनगंटी,अहमद पठाण, भोलेनाथ  बनसोडे,सुनिल गायकवाड, राजेंद्र गाटे, रावसाहेब गुंड, किरण देवकते, मुन्ना कुरेशी आदी मान्यवरांसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी 
9923005236

Post a Comment

0 Comments