Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील सोनबा येवले निवासी विद्यालयातील कु. रिजवान पठाण याचे गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कै. सोनबा येवले मुकबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थी कु. रिजवान ईसाक पठाण याने गोळा फेक  स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

जिल्हा  परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 20 ते 21 डिसेंबर या कालावधीन तुळजाभवानी क्रिडा संकुल धाराशिव येथे आयोजित स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 

या स्पर्धत कैं. सोनबा येवले मुकबधीर निवासी विद्यालयातील  विद्यार्थी कु.रिजवान ईसाक पठाण याने मुकबधिर प्रवर्गातून 13 ते 16 वयोगटातून गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कु. रिजवान याचे शाळेच्या वतीने अभिनंदन केले.

कु. रिजवान पठाण हिस सहशिक्षक महेश भोसले, प्रकाश काकडे, अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments