Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे काटी येथील कै. सोनबा येवले मुकबधिर विद्यालयातील शिक्षिका यास्मिन शेख यांना आदर्श शिक्षिका तर शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून सुशांत क्षिरसागर यांचा सन्मान

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कै. सोनबा येवले निवासी मूकबधिर विद्यालयातील शिक्षिका श्रीमती यास्मिन ईसाक शेख यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर शिक्षकेत्तर कर्मचारी मधून सुशांत खेलनाथ  क्षिरसागर यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या वतीने 3 डिसेंबर 2023 या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित 20 व 21 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग धाराशिव येथे समाजकल्याण अधिकारी गिरी साहेब, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शाम गोडभरले, कै. सोनबा  येवले निवासी विद्यालय संस्थेचे सचिव नितीन भारत सरवदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श  शिक्षक व आदर्श  शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कै. सोनबा येवले निवासी मुकबधिर विद्यालयातील शिक्षिका श्रीमती यास्मिन ईसाक शेख यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर शिक्षकेत्तर कर्मचारी मधून सुशांत खेलनाथ  क्षिरसागर यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी समाजकल्याण अधिकारी , गिरी, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शाम गोडभरले, कै. सोनबा येवले निवासी मुकबधिर विद्यालय संस्थेचे सचिव नितीन भारत सरवदे, कै. सोनबा येवले निवासी मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गोवर्धन पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments