Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

युवा कार्यकर्ते भोलेनाथ बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमधील कॉंग्रेसचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते भोलेनाथ बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त गुरुवार  दि. 28 रोजी सायंकाळी भिमनगरमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजीत शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. युवा कार्यकर्ते भोलेनाथ बनसोडे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ, आजी,माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरपंच सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदीप साळुंके, पत्रकार उमाजी गायकवाड, प्रकाश गाटे, माजी सैनिक  समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संताजी थिटे ,ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे, प्रकाश  सोनवणे, अमोल गावडे, चंद्रकांत काटे, दशरथ बनसोडे, जितेंद्र बनसोडे, दयानंद डोळसे, बाळु क्षिरसागर, विशाल मस्के, राहुल बनसोडे, आनंद डोळसे, सागर वाघमारे, विशाल चव्हाण, जनार्दन बनसोडे, दत्ता बनसोडे, संजय महापूरे, प्रविण क्षिरसागर, सचिन बनसोडे, सुनिल  बनसोडे, साजिद इनामदार,माजीद इनामदार, तबारक इनामदार, दत्ता गाजरे, आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments