मुरुम/ प्रतिनिधी
श्री श्री सिद्धमल्लाप्पा स्वामी म्हणाले की,
समाजात जनजागृती होण्यासाठी पदयात्रा, कीर्तन, प्रवचन, कथा या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य हे पदयात्रेतून होते. सदर पदयात्रा ही युवकांनी स्वयंम उत्स्फूर्तपणे काढली. ही विचारधारा घेऊन गेली अनेक वर्ष राष्ट्रसंत सद्गुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य हे चापोली ते कपिलधार ही पदयात्रा काढत होते. आज त्याचे विशाल स्वरूप झाले आहे. जय महाराष्ट्र मधलं दैवत असणारे संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या साहित्याचा प्रचार, धर्मजागृती, सर्वसामान्यांना माहिती करण्यासाठी या पदयात्रेचा उद्देश आहे. मानवतावादी विचारधारेचा प्रचार-प्रसार करणे, समाजातील अंधश्रद्धा नष्ट करणे हे महात्मा बसवेश्वरांची वचने आहेत. ते आताच्या तरुणांनी अवलंबिले पाहिजे. जगाला विश्वबंधुतेचा विचार देणे गरजेचे असल्याचे मत कोर्नेश्वर महास्वामी यांनी शेवटी व्यक्त केले.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मुरुमच्या बसव सभा मंडप यांच्या वतीने ता. २८ डिसेंबर (गुरुवारी) ते १ जानेवारीपर्यंत मुरूम येथून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प. पु. कोर्नेश्वर महास्वामी, प. पु. सिद्धमल्लय्या महास्वामी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, नारळ मठाचे स्वामी, माजी साखर आयुक्त डी. डी. गायकवाड, माजी पंचायत समिती सभापती गोविंद पाटील, विकासोसेचे चेअरमन दत्ता चाटगे, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, शिक्षक समितीचे अध्यक्ष विलास कंटेकूरे, तात्याराव शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या रथ यात्रेचे उद्घाटन बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत शंके यांनी केले. सूत्रसंचालन देवराज संगुळगे तर देशाटे यांनी आभार मानले. ही पदयात्रा पाच दिवस चालू राहणार असून भुसणी-बलसूर मार्गे बसवकल्याण येथे मार्गस्थ होत आहे. यावेळी मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236
0 Comments