काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी गावाचे प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानकाकडे जाणाऱ्या 30 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या गावालगतच्या पुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला असून पुलाच्या व डांबरीकरणाच्या कामाला ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
मागील सुमारे 30 वर्षांपासून अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या या गावालगतच्या गावाच्या प्रवेशद्वार असलेल्या पुलाचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. उशिरा का होईना पुलाचे काम गावकऱ्यांच्या दृष्टिपथात आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या सुरतगाव ते काटी डांबरीकरणाचे काम सुरु असून हे डांबरीकरणाचे काम बसस्थानकाकडे करण्यात येत आहे.
या पुलाच्या बहुप्रतिक्षित कामाला प्रारंभ झाल्यानंतर सरपंच परिषदेतचे जिल्हाध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच पती सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख, चंद्रकांत काटे, भोलेनाथ बनसोडे, रामहरी लोंढे, ग्रामपंचायत सदस्य भैरीनाथ काळे, माजीद इनामदार, अन्वरखान पठाण, नामदेव काळे, सुनिल गायकवाड आदींनी जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments