Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजपचे नेते तथा प्रदेश सरचिटणीस यांचा भाजपच्या वतीने ॲड.अनिल काळे यांचेकडून सत्कार

तुळजापूर:- भारतीय जनता पार्टीचे नेते व प्रदेश सरचिटणीस  विक्रांत (दादा) पाटील हे सहकुटुंब आई तुळजाभवानीच्या दर्शनास आले होते. त्यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनी त्यांचा तुळजाभवानीची प्रतिमा कवड्याची माळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाठक,गुलंचद व्यवहारे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, प्रदीप शिंदे, इंद्रजित देवकते, जिल्हा चिटणीस साहेबराव घुगे, तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे, शिवाजी बोधले, विकास मलबा, राम चोपदार, विलास राठोड, ऋषिकेश साळुंके, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी पाटील आदी  मान्यवर उपस्थित होते. विशेषतः यावेळी मा विक्रांत (दादा) पाटील यांचे पिताश्री व भाजपचे जेष्ठ नेते रायगड  जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील हे ही दर्शनास आले होते. त्यांचाही यावेळी प्रदेशाच्या वतीने सत्कार करण्यात आला.



ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments