Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी  ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, चंद्रकांत  काटे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनवणे, अनिल  बनसोडे, बाळासाहेब  शिंदे, दलित मित्र नंदु बनसोडे,जयाजी देशमुख, भोलेनाथ बनसोडे, प्रकाश गावडे,बाळासाहेब मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments