Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील भिमनगरमध्ये राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती साजरी

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमध्ये राजमाता जिजाऊसाहेब यांची  426 वी जयंती शुक्रवार  दि. 12 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी कादर शेख यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी अनुसया  नंदु बनसोडे यांनी  राजमाता जिजाऊ संदर्भात आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की,  राजमाता जिजाऊ या एक आदर्श माता, एक आदर्श पत्नी आणि एका महापराक्रमी परम प्रतापी छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या सारख्या पुत्रास जन्म दिल्याचे सांगून प्रत्येक महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी दलित मित्र नंदु बनसोडे, रवि डोळसे, भगवान साबळे, दादाराव डोळसे, भागवत घोंगडे, कादर शेख, राजु बनसोडे, गुड्डी बनसोडे, दिनेश डोळसे, आकाश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments