तुळजापूर /उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे गुरुवार दि. 10 रोजी तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक युवा नेते ऋषिकेश मगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेनं.यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण बोलताना म्हणाले की माझे पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलेले आहे. मागील वीस वर्षात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात विविध विकासकामे करण्यात आलेली आहेत. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने अनेक महत्त्वाची पदे दिली.काँग्रेस पक्षाकडून मला भरभरून मिळालेले आहे. त्यामुळे मी जीवात जीव असेपर्यंत काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही. कॉंग्रेस पक्षाने मला भरभरुन दिल्याने सत्तेसाठी मी कधीही पक्ष सोडणार नसल्याचे कार्यकर्त्यांना आश्वासन देऊन पक्ष बळकटीकरणासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन कॉंग्रेसच्या काक्रंबा येथील चिंतन बैठकीत त्यांनी केले
या बैठकीत काटी गावचे सरपंच सुजित हंगरेकर यांनी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न करुन सर्व कार्यकर्त्याला अंगातील आळस झटकून काँग्रेस पक्षासाठी पुन्हा मैदानात उतरुन काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी या बैठकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैया पाटील,युवा नेते ऋषिकेश भैय्या मगर, सावरगावचे माजी उपसरपंच रामेश्वर तोडकरी, माजी बांधकाम सभापती मुकुंद (दादा) डोंगरे,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, बालाजी बंडगर, अमोल कुतवळ,जळकोटचे सरपंच अशोक पाटील, दिलीप सोमवंशी, बाजार समितीचे संचालक एडवोकेट रामचंद्र ढवळे,साहेबराव अण्णा जाधव, सरपंच परिषदेतचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सुतगिरणीचे संचालक अनिल (दादा) हंगरगेकर, रसिक वाले, साधू बाबा मुळे, हरीश जाधव, लक्ष्मण शिंदे, गोपाळ गोरे, शितल गोरे, गौरीशंकर कोडगिरे, हमीद पठाण, चनाप्पा मसुते,बाबासाहेब देवकते, चिन्मय मगर, दत्ता मस्के, रवी कापसे, मसल्याचे माजी सरपंच बालाजी नरवडे, सुरेश कोकरे,उमेश तांबे, सुधाकर सगट,संभाजी भोसले,किरण जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments