काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुरुवार दि. 29 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने सकाळी 8 ते 2 या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच सन ग्रुप उद्योग समुहाचे सत्यजीत (गजानन) देशमुख यांच्या वतीने गावातील सर्व शाळेतील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप होणार आहे. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार,आदर्श शाळा पुरस्कार,एनएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यानंतर सायंकाळी 6 वाजता दत्त चौकात काटी येथे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार विजेत्या सौ.शुभांगी ढगे यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमासाठी कार्यकारी दंडाधिकारी अरविंद बेळगे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
त्यानंतर सायंकाळी शिवव्याख्याते विशाल गरड यांचे व्याख्यान होणार असून जास्तीत नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी चेअरमन सयाजीराव देशमुख सरपंच सुजित हंगरगेकर यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments