Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त सौ.शुभांगी ढगे व नाबाजी ढगे या पतीपत्नीचा सत्कार

काटी/उमाजी गायकवाड
शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत महिलांचा वाढीता सहभाग असून   शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने महिलांचा वाढता सहभाग ही अतिशय महत्वाची बाब आहे. 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी कन्या शुभांगी नाबाजी ढगे यांच्या शेतीतील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागामार्फत महिलांसाठी दिला जाणारा "जिजामाता कृषिभूषण" पुरस्कार जाहीर  झाला.

काटी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नाबाजी गोरख ढगे यांनी  अल्पावधीतच आपल्या शेती क्षेत्रात केलेली प्रगती आणि या प्रगतीत त्यांच्या पत्नी शुभांगी ढगे यांचाही फार मोठा आहे. त्यांच्या  उल्लेखनीय कामगिरी दखल घेऊन त्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महिलांसाठी दिला जाणारा "जिजामाता कृषिभूषण" पुरस्कार नुकताच जाहीर झाला. 
 
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषी मंडळ कार्यालयाच्या वतीने बुधवार दि. 28 रोजी सकाळी काटी येथे मंडळ कृषी अधिकारी आनंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुंभागी ढगे  व नाबाजी ढगे या पतीपत्नीचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

यावेळी कृषी मंडळ अधिकारी आनंद पाटील, कृषी सहाय्यक कैलास पवार, उपसरपंच जुबेर शेख, कृषी सहाय्यक सुशील चौधरी, कमलाकर दराडे, गणेश दावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बबन ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments