Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लोटस पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

तुळजापूर/प्रतिनिधी 
पथदिवे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, इको फ्रेंडली कूलर, चंद्र ग्रहण, सुर्य ग्रहण, विद्युत घंटा आदी विविध प्रयोगाचे सादरीकरण करत तुळजापूर  येथील लोटस पब्लिक स्कूल मध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाची उत्सुकतेने माहिती घेतली. 

नोबेल पुरस्कार विजेते थोर शास्त्रज्ञ भारतरत्न सी.वी. रमण यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

प्रारंभी मुख्याध्यापक धनंजय शहापूरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आशीष शेजाल, राहुल जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
   
यावेळी विद्यालयातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका पल्लवी कुलकर्णी, रोशनी भिसे, अर्चना शेजाल,अंजली भांबरे आदींनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची माहिती घेतली.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक धनंजय शहापूरकर यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. 

Post a Comment

0 Comments