काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित गुरुवार दि. 29 रोजी सकाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात रक्तदान शिबिरात 75 शिवप्रेमी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरातचे उद्धघाटन सरपंच पती तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घघाटन झाले.
सोलापूर येथील सिध्देश्वर ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 71 जणांनी रक्तदान केले. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मत याप्रसंगी सुजित हंगरगेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच परिषदेतचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, उद्योजक सत्यजित देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, माजी सरपंच शामराव आगलावे, रामेश्वर लाडुळकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल गावडे,रामहरी लोंढे, बाळासाहेब शिंदे,चंद्रकांत काटे,जयाजी देशमुख,कय्युम कुरेशी, शिवलिंग घाणे, सचिन भोजने, दादा इंगळे, अनिल बनसोडे, दत्ता छबिले, निवृत्ती भोजने आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments