Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बालाजी अमाईन्सच्यावतीने सी.एस.आर.अंर्तगत तामलवाडी व गोंधळवाडी शाळेस सॅनेटरी पॅड वेडिंग मशिन व इनसिनेटर मशीन भेट

        
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालय येथे व गोंधळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बालाजी अमाईन्सच्या वतीने सीएसआर अंर्तगत सॅनेटरी पॅड वेडिंग मशिन बसविण्यात आली आहे .

डिसेंबर महिन्यात बालाजी अमाईन्सच्यावतीने तामलवाडी येथील सरस्वती विद्यालय येथे दोन वर्ग खोल्या व गोंधळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत एक वर्ग खोलीचे उद्घघाटन करते वेळी सरस्वती विद्यालय तामलवाडी शाळेत मुलींची संख्या 435 इतकी असल्याने मुलींना त्या दिवसाच्या अडचणीत त्यांना शाळेत सॅनेटरी पॅड उपलब्ध व्हावेत  या करीता बालाजी अमाईन्सचे  व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेड्डी यांनी दोन्ही शाळेत सॅनेटरी पॅड वेडिंग मशिन व इनसिनेटर मशीन बसवून देण्याचे शाळेत शिक्षिका व विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना सागितले होते. गुरुवार  दि. 29 रोजी सकाळी बालाजी अमाईन्सचे मारूती सावंत यांच्या हस्ते सरस्वती विद्यालय तामलवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधळवाडी या शाळांना सॅनेटरी पॅड वेडींग मशीन व इनसिनेटर मशीन देण्यात आली. 

या कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे मारुती सावंत यांचे हस्ते मशीन मुख्याध्यापक यांचे कडे देण्यात आली. सरस्वती विदयालयाचे मुख्याध्यापक सुहास वडणे यांनी सरस्वती विद्यालयास आजुबाजुच्या गावातून विद्यार्थीनी या शाळेत जास्त प्रमाणात येताता शाळेस अशा मशीनची गरज होती.व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी वेडींग मशीन व इनसिनेटर मशीन एका महीन्या उपलब्ध करून दिल्याबददल सर्व संचालक व राम रेड्डी  व राजेश्वर रेड्डी यांचे आभार मानले.

यावेळी गोंधळवाडी शाळेचे श्रीमती सावंत मॅडम, गीरे मॅडम, पीरजादे मॅडम, श्रीमती वटणे मॅडम, गोंधळवाडी मुख्याध्यापक पिंपळे , तोटवाड, शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments