काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि.29 रोजी स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर सातवीतील विद्यार्थ्यांना जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.
यावेळी सातवीतील विद्यार्थी यांचा स्वयंशासन दिन साजरा करत असताना इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करण्याची एक दिवसाची संधी आणि आजपर्यंत शिक्षकाने दिलेला अभ्यास आणि शिक्षण याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी सातवीतील विद्यार्थीनी अर्पिता आडसुळ हिने मुख्याध्यापकाची भूमिका निभावली तर सातवीतील शिक्षक म्हणून प्राजक्ता बामणकर,वैभव म्हमाणे,आर्यन लोके,आदर्श मिरजे,शिवा शिनगारे,संध्याराणी कांबळे व ज्ञानेश्वर कांबळे या सर्व विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक म्हणून सर्व वर्गावर तासिका प्रमाणे अभ्यासक्रम घेऊन पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केले. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वयंशासन दिनातील शिक्षक व्यवस्थित शिकवत आहेत का नाही याची पाहणी केली.
दुपारी निरोप समारंभाच्या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक की. अर्पिता आडसुळ यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी शिक्षक हे किती जोखीमचे कार्य आहे याचा अनुभव व्यक्त करताना मुलांना आश्रु आनावर झाले.शिक्षक म्हणुन कार्य करणे जोखीमचे असल्याचा अनुभव मुलांनी व्यक्त केला.तर सहावीतील विद्यार्थ्यांनी सातवीतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन निरोप दिला.
आईवडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सचोटीने अभ्यास करावा
या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल गवळी यांनी सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप व मार्गदर्शन करताना म्हणाले की, मुलांनी आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुलांनी अभ्यासावर भर द्यावा जेणे करून आयुष्यातील इतर काळ आनंदात जावुन जनसामान्याची सेवा करण्याची संधी मिळू शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी सचोटीने अभ्यास करावा असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी केले. व पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल गवळी, सहशिक्षक राजेंद्र कापसे, गोरख माळी, नितीन माळी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते स्वयंशासन दिनाचे संपूर्ण नियोजन स्वयंशासन दिनातील मुख्याध्यापिका कु.अर्पिता आडसूळ यांनी केले होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments