Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

काटी/उमाजी गायकवाड 
भारतीय सणातील महत्वाच्या समजल्या  जाणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित महिलांमधील  नाते अधिक दृढ व्हावे या हेतूने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मतदार संघातील तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुख्य चौकात जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या वतीने आयोजित गुरुवार दि. 8 रोजी महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे नियोजन येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या अस्मिता ताई कांबळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. राजगौरी विक्रमसिंह देशमुख या होत्या. 

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील या जानेवारी महिन्यात संक्रांतीपासून फेब्रुवारी महिन्यातील रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू सारख्या समारंभामध्ये महिलांनी एकत्र यावे आणि हळदी-कुंकू समारंभाची परंपरा जोपासली  जावी या सामाजिक उद्देशाने गावोगावी महिलांसाठी संक्रांती निमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करतात त्या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. 

काटीमध्ये घेण्यात आलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे व माजी जिल्हा परिषद सदस्या राजगौरी देशमुख यांनी मकरसंक्रांतीनिमित उपस्थित महिलांना प्रभू श्रीरामाची मुर्ती भेट देऊन व तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख  पाहुणे अस्मिता ताई कांबळे व राजगौरी  देशमुख यांचा सत्कार केला.

यावेळी  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे, माजी  जिल्हा परिषद सदस्या राजगौरी देशमुख, माजी पंचायत समिती सदस्या अनुराधा ढगे, माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री पंखे, बचत गटाच्या प्रमुख अनुराधा  गायकवाड, सानिया तांबोळी, सविता काटकर, ज्योती नारायणकर, आशा भाले, पुतळा सोनवणे, रुबिना शेख, रेखा गुंड, संजना शिंदे आदी महिलांसह भाजपचे विधानसभा प्रमुख विक्रमसिंह देशमुख, माजी सरपंच आदेश कोळी,अनिल गुंड, मकरंद देशमुख, दादा बेग,संजय महापुरे, हेरार काझी 
अमर देशमुख,रणजित देशमुख, गोकुळ सोनवणे, संजय साळुंके,रामहरी थोरबोले,भारत आगलावे,मनोज हंगरकर, बाळासाहेब शिंदे,अविनाश देशमुख, श्रीकांत गाटे,अमर (बापू) देशमुख, त्रिगुणशिल साळुंके,मंजूर कुरेशी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments