मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाकडून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल व्हिजीटचे आयोजन गुरुवारी (ता. ८) रोजी करण्यात आले. उमरगा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील नामांकित केमिकल उद्योग व सुपीक पी. व्ही. सी. पाईप उद्योगाची भेट घेऊन तेथील मोठ्या लेव्हलवर होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेची सखोल माहिती विद्यार्थ्यांनी समजून घेतली. भेटी दरम्यान दोन्ही उद्योगातील व्यवस्थापकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याप्रसंगी सुपीक पाईप उद्योगाचे प्रमुख आनंद हिरवे यांनी मार्गदर्शन करताना अश्या भेटीतून विद्यार्थ्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीची माहिती घेऊन भविष्यात उद्योजक बनण्याची प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
या एकदिवसीय औद्योगिक सहलीस रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागातील २५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी या इंडस्ट्रियल व्हिजीटसाठी शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर यांची उपस्थिती होती. या सहलीचे आयोजक प्रा. डॉ. सुजित मठकरी व प्रा. डॉ. सुशील मठपती यांनी केले. प्रा. अजिंक्य राठोड, हर्ष गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या इंडस्ट्रीज व्हिजिटकरिता विद्यार्थ्यांना पाठवताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, राजकुमार रोहीकर, सुजित मठकरी, सुशील मठपती व अन्य.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments