मुरूम/प्रतिनिधी ट
प्रतिकूल काळात जिद्दीने आपल्या दुःखाचा सामना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी खंबीरपणे साथ दिली. माता रमाईच्या पुढे अनेक कौटुंबिक आव्हाने असल्याने त्याकाळी बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाईने नाकारली. कारण त्या स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपणास पाहता येतील कठीण परिस्थितीवर मात करून त्यांची त्यागवृत्ती, समजूतदारपणा, चिकाटी, मानवतावादी दृष्टीकोन, अपार कष्ट करण्याची जिद्य, आर्थिक संकट हे अडचण न मानता त्यावर मात कशी करावी हे महिलांनी माता रमाईचे विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन डॉ. मनिषा नागिले यांनी केले.
धम्ममित्र कांबळे परिवाराच्या वतीने सिद्धार्थ कॉलनी येथे आयोजित बुधवारी (ता. ७) रोजी माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती निमित्त व्याख्यानाप्रसंगी बलसुर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विषयाच्या प्रा. डॉ. मनिषा नागिले या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे होते. यावेळी जिल्हा परिषद स्पेशल शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे, धम्मचारी धम्मभूषण राम कांबळे, माजी सैनिक जीवन कांबळे, येणेगूरचे पत्रकार योगेश पांचाळ, गौरव कांबळे, अमर कांबळे, अशोक बनसोडे, धनंजय किरात, अभिजीत कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. धम्मचारी राम कांबळे यांनी बाबासाहेब इंग्लंडमध्ये असताना माता रमाईला जे पत्र पाठविले त्या पत्राचे सविस्तर वाचन करून मार्गदर्शन केले. यावेळी प्रमिला तुपेरे यांनी रमाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घटनाक्रम रेखाटला. अध्यक्षीय समोराप प्रसंगी डॉ. महेश मोटे म्हणाले की, या तंत्रज्ञानाच्या युगात महिलांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावयाचा असेल तर माता रमाई यांच्या त्यागी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यांचे विचार आपण जोपासले पाहिजेत. याप्रसंगी श्रीज्ञा भालेराव व हर्षदा कांबळे या शालेय विद्यार्थिनींनी माता रमाई या आदर्श कशा होत्या याबाबत विचार मांडल्याबद्ल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सविता भालेराव, अश्विनी कांबळे, सविता गायकवाड, तृप्ती गायकवाड, शांता कांबळे, पंचशीला कांबळे, कल्याणीताई कांबळे, संजिवनी कांबळे, वैशाली माटे, रुपाली गायकवाड, राष्ट्रीयता कांबळे, रमाबाई गायकवाड, गंगूबाई कांबळे, पुजा हिरवे, अनिता कांबळे, वैशाली सितापुरे, वैष्णवी सितापुरे, सत्यभामा कांबळे, मंगल बनसोडे, अनिता बनसोडे, स्नेहल गोडबोले, पंचशिला किरात, पंचशिला कांबळे, संपदा सागर, रेखा मुरुमकर, लक्ष्मी बनसोडे, मिराताई सोमवंशी, महादेवी गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक धम्ममित्र सुनीता कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुकेशनी कांबळे तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. यावेळी शहरातील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
मुरूम, ता. उमरगा येथील सिद्धार्थ कॉलनीमध्ये माता रमाई यांच्या जयंतीप्रसंगी पुष्पहार घालून अभिवादन करताना मान्यवरांसोबत महिला मंडळ.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments