Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात सरपंच, शेतकरी मेळावा

पुणे:- आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर सोमवार दि.5 पासून पुणे दौऱ्यावर आले होते.  सोमवार ते गुरुवार या चार दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी दहा हजार शेतकरी, सरपंच, औद्योगिक प्रतिनिधी तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

श्री श्री रविशंकर यांच्या भेटीदरम्यान आळंदीजवळील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या चार दिवसांच्या सोहळ्याची सुरुवात सोमवारी सायंकाळी  रुद्रपूजेने करण्यात आली.चारही दिवस सायंकाळी धार्मिक  वातावरणात सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन घडवणारे व पुण्याची सांस्कृतिक संपन्नता दर्शविणारे गणेशोत्सव सोहळ्यासारखे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

 पोवाडा, शिवराज्याभिषेक सोहळा, नाशिक ढोल, आदिवासी, कोळी नृत्य आणि पुण्याची सांस्कृतिक संपन्नता दर्शविणारे गणेशोत्सव सोहळा, दिंडी, नांदी, गोंधळ असे विविध कार्यक्रम होतील

गुरुवार दि. 8 रोजी सरपंच, शेतकरी व उद्योजक यांचा श्री श्री रविशंकर यांच्या  सान्निध्यात मेळावा घेऊन त्यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले.

याप्रसंगी हिवरेबाजारचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त सरपंच पोपटराव पवार, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, युवा उद्योजक तथा इंद्रायणी बालन फाऊंडेशनचे पुनीतजी बालन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय  सहाय्यक (ओएसडी), महाराष्ट्र शासनाचे अव्वल सचिव संजना खोपडे, मुख्यमंत्री ओएसडी  डॉ.राहुल गिते,  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे संकल्पक मंगेश चिवटे यांच्यासह शेतकरी, उद्योजक भाविकांना श्री श्री रविशंकर यांनी शुभाशीर्वाद दिले.

Post a Comment

0 Comments