काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील सेवानिवृत्त शिपाई पदावर कार्यरत असलेले रामेश्वर बाबुराव साळुंके हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने रामेश्वर साळुंके यांचा शुक्रवार दि. 28 रोजी भाजपचे विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,आदेश कोळी, मकरंद देशमुख, दादा बेग,अहमदखान पठान,नजीब काझी,सपंत पंके,अविनाश देशमुख, ज्ञानेश्वर गुरव,प्रशांत चव्हाण,मनोज हंगरकर, श्रीकांत गाटे, सांगर सांळुके आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments