मुरुम/प्रा .डॉ. सुधीर पंचगल्ले
उमरगा तालुक्यातील कोराळ येथे संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने गावात बिजनिमित्त आलेल्या गावातील व बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी बुधवारी (ता. २७) रोजी थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली.
संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त आलेल्या गावातील आणि बाहेर गावातून आलेल्या भाविक भक्तांना शुद्ध आणि थंड पाण्याची सोय व्हावी, यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे संस्था अध्यक्ष विक्रम दासमे यांच्या संकल्पनेतून पाणपोईची सोय करण्यात येते. या लोककल्याण सामाजिक संस्थेकडून वर्षभरात सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. या बिजोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या पाणपोईचा शुभारंभ अशोक दासमे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्था सचिव रवि दासमे, मनोहर सुरवसे, परमेश्वर जाधव, किरण दासमे, दिलीप सुरवसे, विष्णू साळुंखे, अण्णाराव साळुंखे, विद्यासागर सुरवसे, संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे, बाबु शेख, अजय सुरवसे, विठ्ठल सुरवसे, गोविंद कोळी, जयपाल गायकवाड, अजय भगत, दत्तात्रय सुरवसे, हनुमंत सगर, शिवराम जंगाले, राजेंद्र सुरवसे, जयश दासमे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : कोराळ, ता. उमरगा येथील लोककल्याण सामाजिक संस्थेकडून पाणपोईचा शुभारंभ करताना संस्थेचे सचिव रवि दासमे, मनोहर सुरवसे, परमेश्वर जाधव, किरण दासमे, दिलीप सुरवसे, विष्णू साळुंखे, अण्णाराव साळुंखे, विद्यासागर सुरवसे, संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे आदी.
0 Comments