तुळजापुर:- शहरात सार्वजनिक हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हनुमान मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जय बजरंग जय वडार युवा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली.
हनुमान जन्मोत्सव सोहळा 12 एप्रिल ते 16 एप्रिल
दरम्यान साजरा केला जाणार असुन विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.16 एप्रिल रोजी शहरात भव्य स्वरूपात मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रावण पवार यांनी दिली. याप्रसंगी लक्ष्मण पवार,धर्मराज पवार उपस्थित होते.
हनुमान मुर्तीची स्थापना प्रसंगी पूजारी नगर फाऊंडेनशनचे अध्यक्ष गणेश पूजारी,उपाध्यक्ष उमाजी गायकवाड,माजी नगरसेवक विजय कंदले, सोमनाथ पूजारी,उत्सव समिती अध्यक्ष सोमनाथ, पवार, उपाध्यक्ष बाळू शिंगे,कोषाध्यक्ष सनी इटकर, मिरवणूक प्रमुख सुरज इटकर,तुकाराम देवकर, मशा काका पवार, चंद्रकांत पवार,राम देवकर, संदीप पवार आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुर्ती स्थापना नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व सर्व हनुमान भक्तांना यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
0 Comments