काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील वेशीतील श्री हनुमान मंदिरात दि.6 एप्रिल ते दि.12 एप्रिल या कालावधीत श्री संत माणकोजी बोधले महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व हभप प्रभाकर महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनानुसार राम नवमी ते हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दि 6 रोजी रामनवमी निमित्त हभप सोमनाथ महाराज कांबळे यांचे प्रवचन व हभप गणपत महाराज चिवरे यांचे हरिकिर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
सोमवार दि 7 रोजी हभप विजय महाराज फंड यांचे प्रवचन व हभप अविनाश महाराज कांबळे यांचे हरिकिर्तन झाले.मंगळवार दि 8 रोजी हभप साधु महाराज देवकर यांचे प्रवचन व हभप काका महाराज पाटील यांचे हरिकिर्तन उत्साहात संपन्न झाले.बुधवार दि 9 रोजी हभप गजानन महाराज भुमकर यांचे प्रवचन व हभप शिवाजी महाराज चिवरे यांचे हरिकिर्तन धार्मिक वातावरणात झाले.गुरूवार दि.10 रोजी हभप नागेश महाराज निंबाळकर यांचे प्रवचन व हभप सुर्यकांत महाराज शिंदे यांचे हरिकिर्तन संपन्न झाले.
शुक्रवार दि.11 रोजी हभप प्रभाकर महाराज पारधे यांचे प्रवचन व हभप सुनिल महाराज ढगे यांचे सुश्राव्य हरिकिर्तन संपन्न झाले.तर शनिवार दि 12 रोजी सकाळी हनुमान जयंतीनिमित्त संपूर्ण गावातून पालखी,वारकरी पताकासह टाळ मृदंगाच्या निनादात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.
त्यानंतर हभप माधव महाराज राशिनकर यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.आणि काल्याची महापंगत कै तुकाराम रोडे यांचे स्मरणार्थ काकासाहेब रोडे व कै दादाराव मासाळ यांचे स्मरणार्थ भालचंद्र मासाळ यांचे तर्फे काल्याचा महाप्रसाद झाला.
हा ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ,हनुमान भजनी मंडळ गाटे गल्ली,महिला भजनी मंडळ, वारकरी मंडळी काटी यांनी बहुमोल सहकार्य केले.
0 Comments