काटी/उमाजी गायकवाड
जागतिक मास रेसलिंग स्पर्धेकरिता तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा सध्या पुणे वास्तव्यास असलेले जयदेव घनश्याम म्हमाणे व पिंपरी चिंचवड, पुणे येथील थेरगाव मधील आर्यन साठे यांची जागतिक मास रेसलिंग स्पर्धेकरिता या दोघांची भारतीय संघात निवड झाली आहे. स्पर्धा 21 ते 27 एप्रिल या कालावधीत त्सकाल्टुबो, जॉर्जिया येथे होणार आहेत. मास रेसलिंग पटू जयदेव म्हमाणे यांनी आतापर्येंत 3 गोल्ड 4 सिल्वर 6 ब्राँझ,अशा विविध पदकाची कमाई केली आहे. तर आर्यन साठे यांनी 2022 साली अझरभाईजन येथे जागतिक स्पर्धेत व नॅशनल स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.
भारतीय संघात 6 खेळाडू, 2 प्रशिक्षक, 1 पंच आणि 1 प्रतिनिधी मंडळ प्रमुख यांचा समावेश आहे. म्हमाणे हे आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच, प्रशिक्षक व पंच आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत यशस्वी कामगिरी केली आहे.
जॉर्जिया मास रेसलिग फेडरेशनचे व जॉर्जिया क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
22 एप्रिल रोजी सकाळी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या संघाचे प्रयाण होणार असून 28 एप्रिल रोजी दुपारी 12.15 वाजता मायदेशी परतणार आहे.
0 Comments