Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मराठा वधू-वर मेळाव्यामध्ये 2260 वधू-वर पालकांचा सहभाग, 6 हजारांवर नोंदणी; इतिहासात सर्वात मोठा मेळावा, आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आमदार कैलास पाटील म्हणाले, मेळावे काळाची गरज, संयोजकांचे कौतुक

धाराशिव/उमाजी गायकवाड 
सामाजिक भावनेतून मराठा समाजातील वधू- वरांसाठी रविवारी (दि.13) मोफत राज्यस्तरीय सूचक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल 2260 इच्छुक वधू आणि वरांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला. तर या मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे 6 हजारांवर नोंदणी झाली आहे. धाराशिवच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा मेळावा पार पडला असून, या आयोजनाबद्दल कौतुक करताना आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच आमदार कैलास पाटील यांनी संयोजकांचे आभार मानले.

शहरातील जिजाऊ चौक येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यास धाराशिव  जिल्ह्यासह सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, परळी, बार्शी, अहिल्यानगर,नागपूर, फलटण, सातारा, बारामती आदी भागातून मराठा समाजाचे वधु-वर व पालक सहभागी झाले होते. 

पहिल्या सत्राचे उद्घाटन आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन  करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात वधू-वर परिचय पत्र स्वीकारून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. तर दुपारच्या सत्रात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने दुसऱ्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले.

या मेळाव्यात पहिल्या सत्रात वधू-वर नोंदणी व दुसऱ्या सत्रात वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. मेळाव्याच्या माध्यमातून वधु वर मंडळीनी एकमेकांशी संवाद  साधला.

यावेळी अनेकांचे विवाह जुळून आले. त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.

वधू-वर मेळावे ही काळाची गरज असून वर्तमानकाळात मुले व मुली उच्चशिक्षित आहेत. लग्नासाठी त्यांच्या व पालकांच्या खूपच अपेक्षा वाढल्या असल्याचे सांगून त्या अपेक्षा पूर्ण करताना तडजोड आवश्यक असते. बाह्यरुपाला महत्त्व देण्यापेक्षा मुलांचे कर्तृत्व, उद्योग,व्यवसाय,परिश्रमाची तयारी, याचा सारासार विचार केला तरच अनुरूप जोडीदार मिळून संसार उत्तम होऊ शकतो, असे मत शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. मराठा समाजातील वधू- वरांसाठी परिचय मेळावे आयोजित करण्याची गरज असून, अशा उपक्रमासाठी आपण सदैव सहकार्य करू, अशी ग्वाही देत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नव्या पिढीने उद्योग व्यवसायाकडे वळावे,असे आवाहन केले.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनीही पालकांसाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अशोक गायकवाड यांनी केले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुधीर पाटील, विक्रम पाटील,उमेश राजेनिंबाळकर,पत्रकार चंद्रसेन देशमुख, प्रीतम बागल, तानाजी जाधव (येडशी), बिभीषण मोरे,ॲड.दर्शन कोळगे,अशोक ठोंबळ, प्रा.अभिमान हंगरकर, विजयकुमार पवार, ॲड.रमेश भोसले, महादेव भोसले, दत्तात्रय भोसले, अर्जुन जाधव,उमाजी गायकवाड,कमलाकर मुंढे, लखन मुंडे, राम मुंडे, विजय देशमुख, अमोल निंबाळकर, समाजवादी  पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांची उपस्थिती होती.

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या यशस्वी मेळाव्याचे संयोजन प्रा.अभिमान हंगरगेकर, विजयकुमार पवार,प्रा.नवनाथ पवार,राजाभाऊ जगताप,उमाजी गायकवाड, मिस्टर. संजय मगर, कैलास तुकाराम पाटील,अशोक चव्हाण,सतिश ढेकणे,महादेव भोसले, दत्तात्रेय भोसले,मिस्टर. अर्जुन जाधव,सतिश पवार, कमलाकर मुंडे,लखन मुंडे, अशोक गायकवाड,अमोल निंबाळकर,गोरोबा लोंढे,
नवनाथ काळे,तानाजी बिरंजे, रमेश सपाटे,राजू तांबे यांनी केले होते.


सामाजिक क्षेत्रातील यांचा झाला सन्मान,
या मेळाव्यात विविध सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शिवाजी निकम (बीड), अशोक गायकवाड(शिवाजीनगर बीड),विक्रम जोगदंड (बीड), किसन वळेकर (बीड), मिस्टर. जयकिसन वाघ (अहिल्यानगर),पोपटराव सपकाळ पाटील,
अनिताताई पाटील (परभणी),स्वाती देशमुख (पूणे), विश्वनाथ वाकुरे (तेर), दशरथ थोरात (बार्शी), रावसाहेब कोळगे (लातूर),सुनील देशमुख (छत्रपती संभाजीनगर), सुभाष कोलते (छत्रपती संभाजीनगर), सुधीर गावडे (सोलापूर), समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी (तुळजापूर), उद्योजक गणेश पुजारी (तुळजापूर) यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments