काटी:-ग्रामीण भागातील श्री दत्त प्रशाला मोहोळ रेल्वे स्टेशन येथील विद्यार्थी हे दरवर्षी राम रेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट कार्ड लिसुन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी राम रेड्डी यांना स्वताः शुभेच्छा लिहून ती पत्रे पोस्टानी पाठवली होती .यंदा मात्र विद्यार्थांनी स्वतः उपस्थित राहुन राम रेड्डी यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राम रेड्डी यांना प्रत्शुयक्ष भेटुन शुभेच्छा देण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे व्यक्त केली होती.त्याप्रमाणे मुख्याध्यापक यांनी शाळेची बस घेऊन ४० विद्यार्थांना घेऊन सोलापूर येथील बालाजी अमाईन्स च्या कार्यालयात सर्व विद्यार्थी घेऊन हजर झाले .बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस गुलाब पुष्प देऊन साजरा केला. सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मस्के यांनी पुष्पगुच्छ देऊन राम रेड्डी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी रामरेड्डी सरांनां गुलाबाचे पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आजपर्यंतच्या आयुष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतः येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल राम रेड्डी हे भावुक झाले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्सचे सर्वेसर्वा राम रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात काय होणार? असे विचारले असता विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरी करणार असे सांगितले. तेव्हा विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता दुसऱ्यांना नोकरी देण्यासाठी उद्योजक व्हावे असे प्रतिपादन राम रेड्डी यांनी केले. या वेळी राम रेड्डी यांनी शिक्षकांना व विद्यार्थांना हॉटेल बालाजी सरोवरचा परीसर मोहोळ शाळेतील मुलांना दाखवला त्याप्रमाणे सर्व ४० विद्यार्थी व शिक्षक यांनी बालाजी सरोवर परीसराची पहाणी केली . यावेळी श्रीदत्त प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना बालाजी सरोवरचा संपूर्ण परिसर दाखवत मिष्ठान्न भोजनाची मेजवानी दिली.
याप्रसंगी श्री दत्त प्रशालेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक विष्णू मस्के,बालाजी अमाईन्स चे दतप्रसाद सांजेकर व अमोल गुंड सचिन मोरे तसेच शाळेतील बाळासाहेब थिटे सर, कृष्णा केवळे, सचिन वाघमारे,निलेश वाघमोडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments