तुळजापूर/उमाजी गायकवाड
समाजवादी पार्टीच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा (भैय्या)देवानंद रोचकरी यांची तर तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे राहुल बाळासाहेब जाधव यांची नुकतीच युवा तालुकाध्यक्षपदी निवड झालेबद्दल येथील नळदुर्ग रोडवरील राज सिरॅमिक ॲन्ड बिल्डिंग मटेरियलचे सर्वेसर्वा सेवानिवृत्त प्राध्यापक राजेंद्र घाडगे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
समाजवादी पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा प्रा.राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जनहितार्थ कामांना प्रथम प्राधान्य देणार
--कृष्णा (भैय्या) रोचकरी
यावेळी खाजगीत उपस्थितांशी संवाद साधताना समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी म्हणाले की,समाजवादी पार्टीच्या माध्यमातून पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार तसेच जनहितार्थ कामांना व सर्वसामान्यांनाचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रा. राजेंद्र घाडगे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या)रोचकरी, उद्योजक गणेश पुजारी, अप्पासाहेब घोडके, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव,विष्णू सुर्यवंशी, माजी सैनिक बाळासाहेब पवार,सिध्दु इंगोले, बालाजी वटणे,आबा पुजारी, अक्षय कोरेकर, कुणाल गायकवाड,जयराज घाडगे, तात्या लबडे,सुनिल वाडकर, शुभम वाडकर, पी.आर.कदम, आदित्य घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments