Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथील प्राचार्य डॉ. रमेश दापके यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त धाराशिवमध्ये रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाच्या वतीने औद्योगिक चर्चा सत्राचे आयोजन.

          माजी प्राचार्य डॉ.रमेश दापके-देशमुख

धाराशिव:-धाराशि येथील माजी प्राचार्य डॉ.रमेश दापके यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया, धाराशिव शाखेतर्फे औद्योगिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुरल चेंबर कॉमर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर असणार आहेत तर प्रमुख  पाहुणे म्हणून कुसूमराम ऍग्रो प्रोसिसींग कंपनीचे कार्यकारी संचालक संतोष टोले,माजी प्राचार्य  डॉ. रमेश दापके, अंबादास घोटेकर, सुनिल पाटील, प्रज्ञात दिवेदी, चेतन पवार, उत्तमराव शिंदे, उदयसिंह दळवी, जयंत पाटील, अजिंक्य अतकरे,स.के.जारवाल, शिवाजी देशमुख यांची उपस्थिती राहणार आ

या औद्योगिक चर्चासत्रात नवोदित उद्योजक आणि तरुणांसाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या औद्योगिक चर्चासत्रात उद्योगासाठी मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी,उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातील शासकीय कार्यालयीन अडचणी आणि त्यांचे निराकरण,व्यवसायासाठी वित्तीय पुरवठा मार्गदर्शन, स्किल डेव्हलपमेंटबद्दल मार्गदर्शन, भविष्यातील उद्योग जगतातील संधी,व्यवसाय का सुरू करावा, कसा सुरू करावा,आणि व्यवसायाची वाढ कशी करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या औद्योगिक चर्चासत्रास धाराशिव येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, छत्रपती संभाजी राजे मार्ग, काकडे प्लॉट येथे शनिवार दि.5 एप्रिल रोजी सकाळी 11:30 प्रारंभ होणार आहे.

तरी या सत्राचा लाभ नवोदित तरुण उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी 8888450500 व 9890343992 या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments