Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बनसोडे तर उपाध्यक्षपदी डोळसे यांची निवड

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भीम नगरमध्ये मंगळवार दि. 1 रोजी सायंकाळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आगामी 134 व्या जयंती उत्सव निमित्त समिती गठीत करण्यात आली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र माथाडी कामगार  युनियनचे जनरल सेक्रेटरी सुनिल बनसोडे व सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक मिलिंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भोलेनाथ बनसोडे तर उपाध्यक्षपदी आनंद डोळसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत खजिनदारपदी अनिल बनसोडे, सहखजिनदारपदी दशरथ बनसोडे तर मिरवणूक प्रमुख दलित मित्र नंदू बनसोडे यांची निवड करण्यात आली. या जयंती उत्साहाची स्थापना 14 एप्रिल रोजी होणार असून मिरवणूक 30 रोजी काढण्यात येणार आहे.

या बैठकीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समस्त दलित समाजबांधवांची अस्मिता आणि श्रध्दा असल्याने 14 एप्रिल रोजी असणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व 30 एप्रिल रोजी निघणारी मिरवणूक दारु मुक्त व जल्लोषात काढण्याचा ठाम निर्धार येथील आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांनी केला आहे.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष भोलेनाथ बनसोडे, उपाध्यक्ष आनंद डोळसे,दलित मित्र नंदू बनसोडे, अनिल बनसोडे,विशाल चव्हाण,दशरथ बनसोडे,उमेश बनसोडे,नागेश जाधव,अशोक बनसोडे,जितेंद्र बनसोडे,अनुसया बनसोडे,रंजना शेरखाने, सोजरबाई बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments