तुळजापूर:-पुजारी नगर फाऊंडेशनच्या वतीने मराठी नववर्ष चैत्र पाडवा निमित्त महिलांचा पारंपरिक वेशभूषा मराठमोळा फॅशन वॉक शोसह महिला बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.
श्रीनाथ लॉन्स येथे पारंपरिक वेशभूषा मराठमोळा फॅशन वॉक शो सादर करण्यात आला, या शो मध्ये १५० महिलांनी सहभाग नोंदवला. फॅशन वॉक शोचे उद्घाटन नम्रता अमर हंगरगेकर, शुभांगी गणेश पूजारी,सुजाता चौगुले,रेखा कदम, डॉ.प्रिया पाटील, दीपाली पूजारी,कल्पना शिंदे, जगदेवी लोंढे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
पूजारी नगर सोसायटीच्या महिलांच्या वतीने शुभांगी गणेश पूजारी यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक वेशभूषेत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत ६० महिलांचा सहभाग होता. बाईक रॅलीतील महिलांनी भगवे फेटे धारण केले होते. ही बाईक रॅली पूजारी नगर नळदुर्ग रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत होती.
बाईक रॅलीतील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत जयघोष केला. याप्रसंगी युवा नेतृत्व निलेश रोचकरी यांनी या रॅलीचे भगवा ध्वज देऊन स्वागत केले, सोबत गणेश पूजारी,श्रावण पवार,डॉ.राजेश पाटील, हरिदास नाईकवाडी, सिद्धेश्वर इंगोले,शिवाजी जोत उपस्थित होते.
सामूहिक आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न
तुळजापूर शहरातील महिलांनी कधीही बाईक रॅलीत सहभाग नोंदवला नाही,किंवा पारंपारिक वेशभूषा परिधान करत रॅम्प वॉक केलेला नाही, हाच धागा पकडून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रमाची संकल्पना सुचली. यातून महिलांमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा हेतू होता. पूजारी नगर सोसायटीमधील महिलांची सामूहिक एकी मला असे उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रेरित करते.
--शुभांगी गणेश पूजारी
0 Comments