तुळजापूर:- सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सावंत हे तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी सपत्नीक देवीचा कुलधर्म कुलाचार केला.
सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी सपत्नीक पुजारी नगर फाऊंडेशनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता पुजारी नगर फाउंडेशनच्या वतीने देवीची प्रतिमा, शाल, साने गुरुजी लिखित "शामची आई " कादंबरी भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, सचिव अनिल आगलावे, राऊत मंडप ॲन्ड साऊंड सिस्टीमचे सर्वेसर्वा काशिनाथ राऊत, महेश पुजारी, किरण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments