तुळजापूर:- तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील रहिवासी तथा समाजवादी पार्टीचे नेते देवानंद (भाऊ) रोचकरी यांचे निकटवर्तीय व प्रदेशाध्यक्ष कृष्णा देवानंद रोचकरी यांचे विश्वासू सहकारी राहुल जाधव यांची समाजवादी पार्टीच्या तुळजापूर तालुक्याच्या युवा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व गावातील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे राहुल जाधव समाजवादी पार्टीचे सदस्य म्हणुन कार्यरत होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा देवानंद रोचकरी यांच्या हस्ते त्यांची नियुक्तीपत्र देऊन तुळजापूर युवा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी यांच्यासह त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी,ॲड.उदय भोसले खंडू बोबडे, राहुल जाधव,कपिल आवताडे, राहुल कदम, अनुष्क कोरडे,महेश वट्टे,अमोल शित्रे, अक्षय सुरवसे,अनिरुद्ध सुरवसे, बाबा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments