धाराशिव:- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे तज्ञ सेवानिवृत्त प्राध्यापक केशव नामदेव कोरके वय 77 वर्षे(मुळगाव धामणगाव ता.बार्शी) यांचे शुक्रवार दिनांक 28 रोजी रात्री 10 वाजता दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर धाराशिव येथील कपिलधार स्मशानभूमीत शनिवारी दि.29 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै.कोरके हे भोसले ज्यु.काॅलेजचे प्राध्यापक कैलास कोरके,शिक्षक काॅलनीतील किशोर कोरके,तसेच ॲड क्रांती कोरके थिटे यांचे वडील तर तुळजापूर तालुक्यातील काही येथील माजी सैनिक संताजी नामदेव थिटे यांचे सासरे होते.
कै.कोरके यांना शोक सभेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सुना, जावाई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
0 Comments