काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे ग्रामदैवत समाधिस्थ श्री.बोधगिरी महाराज संजिवनी सोहळ्या निमित्त शनिवार दि.19 एप्रिल ते शनिवार दि.26 एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह सोहळ्यात विविध नामांकित किर्तनकारांचे किर्तन सेवा पार पडली.
शनिवार दि.26 रोजी किर्तनकार -ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकर (दादा)बोधले महाराज यांचे काल्याचे किर्तन पार पडले. यावेळी हभप गुरुवर्य प्रभाकर (दादा) बोधले भाविकांना संबोधित करताना सांगितले की,भगवंत प्राप्तीसाठी संत संगती हवी.जोपर्यंत संतांची संगत मिळत नाही तोपर्यंत भगवंत प्राप्ती होत नाही.
जिवशिव एकरूप होण म्हणजे काला होय.
आपल्यातील दुर्गुण गेले पाहिजे आणि सदगुण आले पाहिजे म्हणून तुळशीची माळ गळ्यात घातली जाते. संसारातील शिदूरी संपते परंतु परमात्मातील शिदूरी अखंड राहते.म्हणून आज ही दोनशे वर्षापूर्वी घेतलेले समाधिस्त योगी श्री बोधगिरी महाराजांचे नांव अखंड राहिले.असे किर्तनकार -ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकर (दादा)बोधले महाराज यांनी काल्याच्या किर्तनाच्या सांगता प्रसंगी भाविक भक्तांना संबोधित केले.
गेली २० वर्ष तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे गावचे ग्रामदैवत दहा पिठा पैकी एक पिठ असलेले समाधिस्त योगी श्री बोधगिरी महाराज अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज पारायण सोहळळ्याचे आयोजन केले जाते.यावेळी गायनाचार्य म्हणून ह.भ.प. श्रीकांत शिंदे महाराज,ह.भ.प. समाधान निचळ महाराज, ह.भ.प. काका पाटील महाराज,ह.भ.प गणेश माळी महाराज, ह.भ.प समाधान ताटे.तर पखवाज वादक ह.भ.प. प्रविण कुलकर्णी,व बालकलाकार पुरुषोत्तम कुलकर्णी, भजन साद बोधगिरी महाराज भजनी मंडळ केमवाडी यांनी दिली.यावेळी या कार्यक्रमाचा लाभ गावातील सर्व ग्रामस्थांनसह व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेतला.
0 Comments