काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनेक जण लाभार्थी आहेत. परंतु त्यांचे अनुदान मागील पाच महिन्यांपासून बंद आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी तहसीलदार माया माने यांना लेखी निवेदन देऊन अनुदान पुर्ववत करावे अशी मागणी केली आहे. अनुदान सुरू न झाल्यास येथील तलाठी कार्यालयासमोर येत्या 29 तारखेला धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन ‘डीबीटी’द्वारे थेट बँक खात्यावर जमा होते. यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डचे बँक खात्याशी ‘केवायसी’ असणे क्रमप्राप्त आहे. परंतु काटीतील सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्डची बँक खात्याशी केवायसी केलेले असून व त्याचा अहवाल पाठवून देखील त्यांचे अनुदान गेल्या 4 ते 5 महिन्यापासुन बंद आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्यासह, श्रीमती बायडा गुलाब मुजावर, श्रीमती हसमत शेखलाल मुजावर,श्रीमती कुसुम अंबादास तोडकर,श्रीमती जेहदाबी इब्राहिम शेख,श्रीमती कौशल्य लक्ष्मण साबळे, श्रीमती सत्यभामा येडाप्पा कसबे, इस्माईल अंबीर पिंजारी, श्रीमती सुबाना गावडे, जनाबाई जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments