Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माळुंब्रा येथे शाळा पूर्वतयारी अभियान' प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न!


                                       
 काटी/प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे-महाराष्ट्र शासन यांचे मार्फत जून 2024 मध्ये इयत्ता पहिली ला दाखलपात्र बालकांसाठी स्टार्स प्रकल्पांतर्गत 'शाळा पूर्वतयारी अभियान' या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

या उपक्रमामध्ये 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेचा सहभाग आहे.त्या अनुषंगाने तुळजापूर  तालुक्यातील सुरतगाव केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीला अध्यापन करणारे शिक्षक, अंगणवाडी ताई व लीडर माता असे एकूण 57 प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन जि.प.प्रशाला माळुंब्रा येथे गटशिक्षणाधिकारी श्रीमती मेहरूनिसा इनामदार व विस्ताराधिकारी अर्जुन जाधव यांच्या नियंत्रणाखाली केंद्रप्रमुख श्रीमती शारदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8 ते 12:30 या वेळेत करण्यात आले.  

नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या मुलांची शाळा पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे एप्रिल महिन्यात एक व जूनच्या दुसऱ्या आठवड्यात एक असे दोन मेळावे शाळा स्तरावर घेण्यात येणार आहेत.पहिल्या मेळाव्यात मुले पहिलीत दाखल होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मूलभूत क्षमता किती विकसित आहेत यांची नोंद कृतीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. 

ज्या मुलांना मूलभूत क्षमता आवश्यक असलेल्या कृती करताना मदतीची गरज लागते;त्या मुलांच्या पालकांना शिक्षक व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीय यंत्रणा यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे. दुसऱ्या मेळाव्यापर्यंतच्या कालावधीत पालकांच्या भेटी घेऊन समुपदेशन करण्यात येणार आहे. मार्च 2022 पासून हे अभियान सुरु असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तरतूदींनुसार पूर्वप्राथमिक विभाग व शाळा यांच्यातील समन्वयाने विद्यार्थ्यांमध्ये शाळास्तरावर  आवश्यक क्षमता व कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे.त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी या अभियानाची मदत होणार आहे.शाळा पूर्वतयारी मेळावे कशा पद्धतीने घ्यावेत याबाबतची रंगीत तालीम माळुंब्रा येथील अंगणवाडीतील प्रवेशपात्र 18 बालकांच्या मदतीने मेळावा आयोजित करून घेण्यात आली.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या मदतीने बालकांची प्रवेशदिंडी काढून तसेच गुलाबपुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.स्वयंसेवक म्हणून उपस्थित शिक्षकांच्या मदतीने बालकांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनात्मक,भाषिक विकास व गणनपूर्व तयारी इ.कौशल्ये तपासून विकासपत्रामध्ये याची नोंद करण्यात आली.

सदरील मेळाव्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.विभावरी गायकवाड,प्राथमिक शाळेच्या मु.अ.अनिता जांभळे तसेच काटोळे मँडम,कोळपुसे सर यांचेसह उपस्थित  सर्व शिक्षक,अंगणवाडी ताई,लीडर माता यांचे सहकार्य लाभले.
 या प्रशिक्षणासाठी सूरतगाव केंद्रातील 38 शिक्षक,12 अंगणवाडी ताई व 7 लीडर माता असे एकूण 57 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.प्रशिक्षण सुलभक म्हणून केंद्रप्रमुख शारदा चव्हाण, शांताराम कुंभार व अगरचंद शिंदे यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments