Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे काटी केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद एप्रिल 2024 संपन्न

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी  केंद्रा अंतर्गत येणाऱ्या 
जि.प. शाळांची शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील अखेरची शिक्षण  परिषद शनिवार  दि. 13 रोजी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेत घेण्यात आली. 

बदलत्या काळानुसार व शिक्षण क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल व परिवर्तन यादृष्टीने शिक्षकवर्गानेही नाविण्याचा ध्यास घेऊन आपल्यातील कौशल्ये अधिक विकसित करावीत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षण  परिषदेमध्ये केंद्राचे केंद्रप्रमुख हणमंत कदम यांनी शाळा पुर्वतयारी व आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

काटी केंद्रातील सर्वच शिक्षकांनी उत्तम टीमवर्कसह टेबलनिहाय शैक्षणिक साहित्य निर्मिती केली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच शिक्षकांचे केंद्र प्रमुख कदम यांनी  अभिनंदन केले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड
9923005236

Post a Comment

0 Comments