काटी/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील स्व.रुक्मिणीबाई लक्ष्मण हंगरकर यांच्या 9 व्या पुण्यतिथीनिमित्त रुक्मिणी फाऊंडेशन च्या संचालिका सौ.शामल माणिकराव शिंदे-हंगरकर यांच्या वतीने माई बालभवन,मामुर्डी,देहूरोड येथे दि.11 रोजी मान्यवरांचे उपस्थितीत अनाथ,दिव्यांग बालकांना मिष्टान्न भोजन देऊन अन्नदान करण्यात आले.
माई बालभवन ही संस्था प्रतिज्ञा देशपांडे इंगळे यांनी सन 2006 मध्ये अनाथ,दिव्यांग मुलांसाठी स्थापन केली असून आज पर्यंत 36 अनाथ मुलींचे विवाह लावून दिले आहेत.आज या संस्थेत 45 अनाथ व दिव्यांग बालके आहेत.या बालकांना अन्नदान करण्यात आले.
या प्रसंगी प्रा माणिकराव शिंदे,सौ.शामल माणिकराव शिंदे-हंगरकर,विलास जाधव,सौ.सुजाता विलास जाधव,श्रद्धा तुषार शिंदे,सौमिका शिंदे,माई बालभवनचे संचालक मधुकर इंगळे, सर्व स्वयंसेवक,अनाथ व दिव्यांग बालक उपस्थित होते.अशा तर्हेने कै.रुक्मिणी हंगरकर यांची 9 वी पुण्यतिथी अन्नदान करुन शिंदे परिवारातर्फे साजरी करण्यात आली.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments