Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे एस.एम. ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. 14 रोजी सकाळी येथील अण्णाभाऊ साठे नगरमधील एस.एम. ग्रुपच्या वतीने भारतरत्न तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी भाजपचे विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपचे  जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी सरपंच  आदेश कोळी, माजी पंचायत  समिती सदस्य रामहरी थोरबोले, ग्रामपंचायत  सदस्य अनिल गुंड, दादा बेग, मकरंद देशमुख, चेअरमन संजय साळुंके, बाळासाहेब भाले, गोकुळ सोनवणे,ज्ञानेश्वर गुरव, रफिक कुरेशी, बहुजन रयत परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय महापुरे आदींसह एस.एम. ग्रुप मधील  सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments