Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे मराठवाड्याचे प्रवेशद्वार तामलवाडी टोलनाक्यावर जंगी स्वागत; गर्दी पाहून अर्चनाताई पाटील डोळ्यातून आनंदाश्रू

 
काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या तामलवाडी येथील टोलनाक्यावर महायुतीच्या हजारों कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

मुंबई येथे भाजपचे तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी गुरुवार दि.4 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिवकडे जाताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, व शिवसेना शिंदे गटातील हजारों कार्यकर्त्यांनी तामलवाडी येथील टोलनाक्यावर मोठा पुष्पहार घालून व जेसीबीतून फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले. स्वागताची गर्दी पाहून आमदार राणाजगजितसिंह पाटील  व अर्चनाताई पाटील भारावून गेल्याचे दिसून आले. तर अर्चनाताई पाटील यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, राणा दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. अर्चनाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments