काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील पर्यावरणवादी सर्वसामान्य शेतकरी मोहन चंद्रहरी शिंदे यांनी सामाजिक कार्याचे भान ठेवून गुढीपाडव्याचे औचित्य साधून मंगळवार दि.9 रोजी दुपारी वन्यप्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी पाणवठ्याचा शुभारंभ करण्यात आला. भाजपचे विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते शेतामध्ये पाणवठ्याचे उद्घघाटन करण्यात आले.
येथील सर्वसामान्य उत्साही पशुपालक शेतकरी मोहन चंद्रहरी शिंदे यांनी उन्हाळ्याची चाहुल लागताच सलग नवव्या वर्षी वन्य प्राण्यासाठी पानवठा तयार करून वन्यप्राण्यांसाठी व पक्षांना पिण्याची पाण्याची सोय केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.
जिल्ह्याचा तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. यंदा मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अत्यंत भयावह आहे. ओढे , नदी,नाले, विहीर, बोअरवेल कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे गावांमधील पाळीव जनावरांना देखील चारा व पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्याचबरोबर जंगलातील वन्य प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. पाण्यासाठी आसुसलेल्या या मुक्या जित्राबांची तहान भागावी यासाठी सलग नवव्या वर्षी शिंदे यांनी पाणवठा उपलब्ध करुन दिल्याने ‘दुष्काळातही माणुसकीचा झरा वाहतोय’ अशीच प्रचिती यामुळे येत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने अंगाची लाहीलाही होत असून नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र ओडे, नाले तलाव कोरडे पडले आहेत. पाण्यावाचून होरपळणारे वन्यप्राणी व पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र सध्या चोहीकडे दिसत आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यात होरपळणार्या वन्यप्राण्यांना व पक्षांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक बांधिलकीची भान ठेवत पर्यावरणवादी पशुपालक शेतकरी मोहन शिंदे यांनी वन्यप्राण्यांसाठी पाणवठा तयार करुन पाईपलाइन द्वारे पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल काटीसह परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, माजी सरपंच आदेश कोळी, अनिल गुंड, भागवत गुंड, मोहन शिंदे, सुहास साळुंके, अविनाश देशमुख, सचिन सावंत, बाळासाहेब शिंदे, संपत पंखे, सचिन काळे, कादर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments