Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी-तुळजापूर रोडवर सागर मोटर्सच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील लाडुळकर बंधूं यांच्या  सागर मोटर्सच्या वतीने गुढीपाडव्याच्या  शुभमुहूर्तावर सलग दुसऱ्या वर्षी काटी -तुळजापूर रोडवरील सागर मोटर्सच्या समोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 9 रोजी 
नागरिकांसाठी पाणपोईचा शुभारंभ  करण्यात आला.

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने या मार्गावरील येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची पाण्याची सोय व्हावी, यासाठी पाणपोई सुरू करण्यात आली असल्याचे सागर मोटार्सचे परमेश्वर  लाडुळकर यांनी सांगितले.

यावेळी प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, वसंत हेडे, रामेश्वर लाडुळकर, चंद्रकांत काटे, परमेश्वर लाडुळकर, अभिमान बामणकर, ज्ञानेश्वर लाडुळकर,भैरी लाडुळकर, महेश पांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments