मुरुड/प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील मुरुड येथील
ठोंबरे नगर भागात राहणाऱ्या एक मनमिळाऊ व सुसंस्कृत, सुस्वभावी व्यक्तीमत्व असलेल्या
सुशिला नारायण मोटे यांचे शनिवारी दि. (१८) रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली होती.
त्यांच्या पार्थिवावर मुरुड येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शनिवार (ता.१८) रोजी सायं.६ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महेश मोटे व बोरगाव (न.) ता.औसा येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोटे यांच्या मातोश्री होत्या.
0 Comments