Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील नृसिंह जयंती निमित्त आयोजित पंचदिनी किर्तन महोत्सवात भक्तिमय वातावरण;अंधश्रद्धेचे समुळ उच्चाटन करा, जल, जंगल व जमीन हे तीन निसर्गनिर्मित घटक वाचवा व आईवडिलांची सेवा करा तरच शाश्वत विकास निश्चित --हभप सागर महाराज बोराटे (नातेपुते)

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील नृसिंह  जयंती निमित्त पंचदिनी किर्तन महोत्सवाच्या निमित्ताने येथे प्रति पंढरपूर अवतरले आहे. टाळ मृदंग व विणेचा झंकार आसमंत निनादणारा ज्ञानोबा तुकारामासह हरिनामाचा जयघोष, सजीव आरास, हजारोंचा अशा सौहर्द्राच्या भक्तीमय चैतन्याने भारलेल्या वातावरणात पंचदिनी किर्तन महोत्सवात भाविक, महिला भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले. सायंकाळी येथील वातावरण धार्मिक बनले होते. भाविक भक्त आणि संत मंडळी टाळ मृदंगांच्या साथीने हरिनामात तल्लीन होऊन विठ्ठल नामाचा गजर करीत असल्याने भक्तांची मांदियाळी पसरली आहे.”याची देही याची डोळा “येथे संत मेळा साकारल्याचे दिसत आहे.

या सोहळ्याचा शुभारंभ रविवार  दि.17 मे रोजी रात्री 9 वाजता ग्रामस्थांच्या  उपस्थितीत माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, उद्योजक अमरसिंह देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे यांच्या हस्ते संत तुकाराम  महाराज व नृसिंह याच्या प्रतिमेचे पूजन  करुन करण्यात आला.

येथील  बसस्थानक जवळ कै. विजयसिंह देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील मैदानात
रात्री 9 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज प्रबोधनात्मक किर्तनकार हभप सागर महाराज बोराटे (नातेपुते) यांच्या सुश्राव्य अशा किर्तनाने या पंचदिनी किर्तन महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. हभप बोराटे महाराज यांनी त्यांच्या किर्तनात ज्ञानेश्वर माऊलींच्या  हरिपाठातील "लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम 
॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥" तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥ 
या अभंगाचे  निरुपण करीत भाविकांना टाळी मुखाने विठ्ठल नाम घेत राहा असा सोहळा प्रत्यक्ष स्वर्गातही नसून हरिनामानेच आपला उध्दार होणार असल्याचे आपल्या अभंगवाणीतून अनेक दाखले दिले. आपल्या सुमधुर भजन  गायनाने  टाळ मृदंग व टाळ्यांच्या साथीने सर्वांना नामस्मरणात दंग केले होते. तसेच त्यांनी किर्तनाच्या शेवटी भाणामती, करणी केली आहे हे मनातून काढून टाका, जीवनातून अंधश्रद्धा समूळ नष्ट करा, दुसरे दुसरे माणसाची भाषा त्याच्या सुसंस्कृतपणाचे परिमाण देते.सोडलेला बाण आणि फेकलेला शब्द परत घेता येत नाही. शब्द घाव करू शकतात. शब्द सुधारले तर भाषा सुधारेल आणि भाषा सुधारली तर आपले  व्यक्तिमत्त्व सुधारेल म्हणून शब्द जपून वापरा आणि जल, जंगल व जमीन हे तीन घटक निसर्गनिर्मित असून हे तीन घटक वाचवा व आई-वडिलांची सेवा करा तरच  शाश्वत विकास हा निश्चित आहे, असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून व्यक्त केले. हभप सागर महाराज बोराटे यांच्या किर्तन सोहळ्यात प्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद श्री शंकर महाराज अनपट (आळंदी),  गायनाचार्य संगीत विशारद श्री समाधान महाराज निचळ (आळंदी), व प्रसिद्ध मृदंग सम्राट
श्री. कृष्णा महाराज कदम (आळंदी) यांच्या साथीमुळे या किर्तन सोहळ्याला रंगत आली होती. 

पुढे जाती धर्माबद्दल सांगताना हभप सागर महाराज बोराटे म्हणाले की,हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, अण्णा भाऊ साठे अशा विविध थोर महापुरुषांचा, विचारवंतांचा व संतांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातील या थोर  महापुरुषांना ठराविक एका जातीत अडकविले  जात असल्याची खंतही त्यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून व्यक्त करीत सर्व जाती धर्मांनी गुण्यागोविंदाने रहावे असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

या किर्तन सोहळ्यासाठी काटीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा किर्तन महोत्सव बुधवार दि. 22 मे पर्यंत चालणार असून दररोज रात्री 8 ते 10 या कालावधीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांचा किर्तन  महोत्सव  संपन्न होणार असून रविवार दि. 19 रोजी शब्द प्रभू हभप संग्राम बापू भंडारे (आळंदी), सोमवार दि. 20 रोजी वाणी भूषण हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा), मंगळवार दि. 21 रोजी किर्तन केसरी हभप आक्रुर महाराज साखरे (गेवराई) यांचा किर्तन सोहळा  होणार आहे. तर बुधवार दि. 22 रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत भाषा प्रभू हभप श्री अनिल महाराज पाटील (बाबळगाव) यांचे काल्याच्या किर्तनाने व सामुदायिक  महाप्रसादाने या पंचदिनी किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे. हा पंचदिनी किर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती परिश्रम घेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा
मुख्य संपादक 
Only न्युज तुळजापूर 
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments